Mobile Buying Guide in Marathi 2026 | नवीन स्मार्टफोन कसा निवडावा?

 

Mobile-Buying-Guide-By-Marathi-Public-Blog


सध्याच्या काळात नवीन स्मार्टफोन खरेदी करणे म्हणजे एखादे कोडे सोडवण्यासारखे झाले आहे. बाजारात दर आठवड्याला नवीन फोन लाँच होतात आणि कंपन्यांच्या 'मार्केटिंग गिमिक्स' (Marketing Gimmicks) मुळे सामान्य माणूस गोंधळून जातो. "किती जीबी रॅम असावी?", "कॅमेरा किती मेगापिक्सेलचा असावा?", "प्रोसेसर कोणता चांगला?" असे अनेक प्रश्न पडतात.

जर तुम्ही २०२६ मध्ये नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या 'मोबाईल बायिंग गाईड' (Mobile Buying Guide in Marathi 2026) मध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य फोन कसा निवडावा, याची सविस्तर आणि तांत्रिक माहिती अगदी सोप्या भाषेत सांगणार आहोत.

🔎 तुमचा वापर कशासाठी आहे? (Usage First Approach)

मोबाईल खरेदी करताना सर्वात आधी स्वतःला हा प्रश्न विचारा:

📞 फक्त कॉल, ऑफिस Apps मल्टीटास्किंग, Basic Gaming आणि WhatsApp, Instagram, YouTube साठी?  (Budget - 15k to 25k)

📸 चांगला कॅमेरा हवा आहे? YouTube/Instagram कंटेंट बनवायचा आहे? (Budget - 40k+)

🎮 फक्त उत्तम गेमिंगसाठी, गेमिंग stream साठी मोबाईल पाहिजे? (Budget 20k to 40k)

👉 कारण: गरजेनुसार मोबाइल स्पेसिफिकेशन सेट केला जातो. आणि या स्पेसिफिकेशन सह सेप्रेट बजेट पण ठरलेला असतो.


१. सर्वात महत्त्वाचा भाग: प्रोसेसर (Processor/SoC)

मोबाईलचा मेंदू म्हणजे त्याचा प्रोसेसर. तुमचा फोन किती वेगाने चालेल, हँग होईल की नाही, हे सर्व प्रोसेसरवर अवलंबून असते. २०२६ मध्ये प्रोसेसर निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा:

  • सामान्य वापरासाठी: जर तुमचा वापर फक्त कॉलिंग, व्हॉट्सॲप आणि युट्यूब पाहण्यापुरता असेल, तर Qualcomm Snapdragon 6 Gen मालिका किंवा MediaTek Dimensity 7000 मालिकेचे प्रोसेसर उत्तम आहेत.
  • हेवी युजर्स आणि गेमर्ससाठी: जर तुम्ही मोबाईलवर हेवी टास्क करत असाल, तर Snapdragon 8 Gen मालिका (उदा. 8 Gen 3 किंवा 8 Elite Gen 5) किंवा MediaTek Dimensity 9000 मालिकेचे प्रोसेसर निवडा.

⭐ लोकप्रिय प्रोसेसर ब्रँड्स

  • Qualcomm (Snapdragon)
  • MediaTek (Dimensity Series)
  • Samsung (Exynos)
  • Apple (A Series / Bionic)

📌 टिप:

  • Casual वापर: Snapdragon 6 series / Dimensity 700+
  • Gaming: Snapdragon 8 series / Dimensity 8000+
  • Long-term use: 4nm किंवा 5nm chipset निवडा (Power Efficient)
💡 प्रो टीप: फोनचा 'Antutu Score' तपासा. ठीकठाक (Average) परफॉर्मन्ससाठी कमीत कमी 5 लाख ते 7 लाख  (Minimum 500,000 to 700,000) Antutu Score' असावागेमिंग साठी 7 लाखापेक्षा जास्त Antutu स्कोर असलेला प्रोसेसर निवडावा.


२. रॅम आणि स्टोरेज: नुसते आकडे बघू नका (RAM & ROM Speed)

कंपन्या ग्राहकांना जास्त रॅम दाखवून भुरळ घालतात (उदा. 8GB + 8GB Virtual RAM), पण 'व्हर्च्युअल रॅम' हा फक्त मार्केटिंगचा भाग आहे, त्याचा प्रत्यक्ष परफॉर्मन्सवर फारसा फरक पडत नाही.

  • RAM (रॅम): २०२६ मध्ये अँड्रॉइड फोनसाठी किमान 8GB RAM असणे आवश्यक आहे. जर बजेट चांगले असेल तर 12GB RAM कडे जा. तसेच रॅमचा प्रकार LPDDR5 किंवा LPDDR5X आहे का ते तपासा.
  • Storage (स्टोरेज): फोनमध्ये कमीत कमी 128GB किंवा 256GB स्टोरेज असावे. पण याहूनही जास्त महत्त्वाची असते 'स्टोरेजची गती'. फोन घेताना त्याचे स्टोरेज UFS 3.1 किंवा UFS 4.0 आहे ना, याची खात्री करा. जुन्या UFS 2.2 मुळे फोन काही महिन्यांतच स्लो व्हायला लागतो.

३. डिस्प्ले आणि स्क्रीन क्वालिटी (Display Technology)

तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ मोबाईलच्या स्क्रीनकडे बघण्यात घालवता, त्यामुळे डिस्प्लेशी कधीही तडजोड करू नका.

  • पॅनेलचा प्रकार: नेहमी AMOLED किंवा OLED डिस्प्ले असलेलाच फोन निवडा. यात रंगांची अचूकता आणि 'Perfect Black' रंग मिळतो. LCD डिस्प्ले आता जुने झाले आहेत.
  • रिफ्रेश रेट (Refresh Rate): स्क्रीन किती स्मूथ चालते हे रिफ्रेश रेटवर अवलंबून असते. सध्याच्या काळात किमान 120Hz रिफ्रेश रेट असलेला फोनच घ्यावा.
  • ब्राईटनेस (Nits): उन्हात फोन वापरताना स्क्रीन स्पष्ट दिसावी यासाठी फोनचा पीक ब्राईटनेस किमान 1000 Nits ते 1500 Nits च्या वर असायला हवा.

काय पाहावे?

  • 120Hz Refresh Rate (Smooth scrolling)
  • Full HD+ Resolution
  • HDR10+ Support (Netflix, YouTube साठी)

👉 2026 मध्ये किमान 120Hz स्क्रीन निवडणे फायदेशीर.


४. कॅमेरा: फक्त मेगापिक्सेलच्या जाळ्यात अडकू नका! (Camera Specs)

२०० मेगापिक्सेलचा कॅमेरा १२ मेगापिक्सेलच्या कॅमेरापेक्षा चांगला असेलच असे नाही. फोटोची क्वालिटी 'सेन्सरच्या साईझ' (Sensor Size) आणि 'इमेज प्रोसेसिंग' वर ठरते.

  • OIS (Optical Image Stabilization): फोन घेताना मुख्य कॅमेऱ्यात OIS आहे का ते नक्की तपासा. यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना कॅमेरा हालत नाही आणि रात्रीच्या वेळी (Low light) फोटो ब्लर येत नाहीत.
  • अल्ट्रावाईड लेन्स (Ultrawide): २ मेगापिक्सेलचा मॅक्रो किंवा डेप्थ सेन्सर हा कुचकामी असतो. त्याऐवजी ८ किंवा १२ मेगापिक्सेलचा चांगला 'अल्ट्रावाईड' कॅमेरा असलेला फोन निवडा.
  • AI फोटोग्राफी: २०२६ मध्ये कॅमेरा सॉफ्टवेअरमध्ये AI चा मोठा वाटा आहे. त्यामुळे Google Pixel, Samsung Galaxy किंवा Vivo चे कॅमेरा फोन्स त्यांच्या उत्तम इमेज प्रोसेसिंगसाठी ओळखले जातात.

📌 Content Creator असाल तर:

  • 4K Video Recording
  • Front Camera 16MP+ OIS


५. बॅटरी आणि फास्ट चार्जिंग (Battery Life)

  • बॅटरी क्षमता: सध्याच्या 5G युगात आणि 120Hz डिस्प्लेच्या जमान्यात मोबाईलची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे कमीत कमी 6000mAh क्षमतेची बॅटरी असलेला फोनच खरेदी करा.
  • चार्जिंग गती: फोनमध्ये कमीत कमी 60W किंवा 90W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट असावे. तसेच बॉक्समध्ये चार्जर दिला आहे की नाही, हे नक्की तपासा (सध्या अनेक कंपन्या बॉक्समधून चार्जर हटवत आहेत).

६. बजेट आणि तुमच्या गरजा (तुमचा 'Sweet Spot' कोणता?)

फोन घेताना सर्वात आधी स्वतःची गरज ओळखा.

  • १५,००० रुपयांच्या खाली (बजेट फोन्स): सामान्य वापर, कॉलिंग, सोशल मीडियासाठी उत्तम. यात तुम्हाला IPS LCD डिस्प्ले आणि सामान्य प्रोसेसर मिळेल.
  • १५,००० ते २५,००० रुपये (मिड-रेंज): या बजेटमध्ये तुम्हाला चांगला AMOLED डिस्प्ले, 6000mAh बॅटरी आणि ठीकठाक कॅमेरा मिळतो.
  • ₹४०,००० चे बजेट (फ्लॅगशिप किलर): जर तुम्हाला 'कॅमेरा', 'गेमिंग परफॉर्मन्स', आणि 'बॅटरी लाईफ' या तीनही गोष्टींना एकाच वेळी प्राधान्य द्यायचे असेल, तर हे बजेट तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. या रेंजमधील स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला पॉवरफुल प्रोसेसर मिळतो. या बजेटमध्ये 'PUBG, BGMI' सारखे ग्राफिक्स-हेवी ॲक्शन गेम्स अगदी स्मूथ चालतात, फोन गरम होत नाही आणि कॅमेरा क्वालिटीही प्रीमियम लेव्हलची असते.
  • ६०,००० च्या वर (प्रीमियम फ्लॅगशिप): यात तुम्हाला iPhone, Samsung Galaxy S Series सारखे सर्वोत्कृष्ट फीचर्स, वायरलेस चार्जिंग आणि वॉटरप्रूफिंग (IP68/69) मिळते.

७. सॉफ्टवेअर आणि AI फिचर्स (Software Updates & UI)

तुमचा फोन किती वर्षे चांगला चालेल हे त्याच्या सॉफ्टवेअरवर ठरते.

  • फोनचा 'User Interface' (UI) क्लीन असायला हवा (उदा. Stock Android, OxygenOS, किंवा OneUI). ज्या फोनमध्ये खूप जास्त फालतू ॲप्स (Bloatware) आणि जाहिराती येतात ते फोन्स घेणे टाळा.
  • कंपन्या किती वर्षांचे OS Updates देणार आहेत हे तपासा. २०२६ च्या मानकांनुसार चांगल्या फोनला किमान ३ वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि ४ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळायलाच हवेत.

८. इतर आवश्यक गोष्टी (IP Rating & Build Quality)

  • IP Rating: फोन पाण्यात किंवा पावसात भिजल्यास खराब होऊ नये म्हणून त्याला किमान IP54 किंवा IP67/68/69 रेटिंग असावी.
  • 5G बँड्स: फोनमध्ये सर्व आवश्यक 5G बँड्स (किमान ८ ते १० बँड्स) सपोर्ट करतात की नाही याची खात्री करा.
  • बिल्ड क्वालिटी: मागील बाजू काचेची (Glass back) असो वा पॉलीकार्बोनेटची, फोन हाताळायला सोपा आणि मजबूत असावा. (Gorilla Glass Protection Must)


📊 क्विक कम्पॅरिझन: कोणता फोन तुमच्यासाठी योग्य? | User wise Quick Comparison

फिचर / गरजबेसिक युजरगेमर / हेवी युजरकॅमेरा प्रेमी (Vloggers)
प्रोसेसरSnapdragon 6 SeriesSnapdragon 8 Gen Seriesउत्तम Image Signal Processor
रॅम/स्टोरेज6GB / 128GB (UFS 2.2)12GB / 256GB (UFS 4.0)8GB / 256GB (UFS 3.1)
डिस्प्लेLCD किंवा बेसिक AMOLED120Hz/144Hz AMOLED120Hz AMOLED (High Nits)
कॅमेरासामान्य 50MPकॅमेऱ्याला कमी प्राधान्यOIS आणि मोठा सेन्सर (Sony IMX)
बजेट₹१०,००० ते ₹१५,०००₹३५,००० ते ₹४५,०००₹४०,००० ते ₹६०,०००

🛑 मोबाईल खरेदी करताना होणाऱ्या चुका

❌ फक्त मेगापिक्सेल बघणे
❌ Brand Name वर blind विश्वास ठेवणे
❌ Update policy न तपासणे
❌ Review न वाचता खरेदी करणे


🛡️निष्कर्ष (Conclusion)

मोबाईल खरेदी करताना फक्त जाहिरातींवर विश्वास ठेवू नका. तुमच्या गरजेनुसार:

✔ Processor
✔ Display
✔ Camera
✔ Battery
✔ Software Support

हे सर्व तपासून मगच निर्णय घ्या.

मित्राने किंवा मैत्रिणीने iPhone घेतला किंवा Samsung Galaxy Series मोबाईल घेतला म्हणून जरुरी नाहीये कि तुम्ही सुद्धा तो मोबाइल घ्यावा.

विद्यार्थी असाल तर चांगले शिक्षण घ्या आपले आई वडील त्यांचे पोट मारून तुमच्या गरजा पुरवत असतात याचे भान ठेवा. शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला लागा आणि मग स्वतःच्या पगाराचा हवा तो मोबाईल घ्या.

गरजेनुसार मोबाईल निवडणे शहाणपणाचे आहे.


🙋‍♂️ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs on Mobile Buying Guide in Marathi)

प्रश्न १: २०२६ मध्ये 8GB रॅम पुरेसा आहे का? 

उत्तर: होय, सामान्य ते मध्यम वापरासाठी 8GB रॅम पुरेसा आहे. पण जर तुम्ही खूप जास्त गेमिंग करत असाल किंवा एकाच वेळी अनेक जड ॲप्स वापरत असाल, तर भविष्यातील वापरासाठी 12GB रॅम घेणे अधिक चांगले राहील.

प्रश्न २: कॅमेऱ्यात OIS असणे का महत्त्वाचे आहे? 

उत्तर: OIS (Optical Image Stabilization) मुळे तुमचे हात हलले तरी कॅमेरा लेन्स स्वतःला स्थिर ठेवते. यामुळे चालताना काढलेले व्हिडिओ स्मूथ येतात आणि काढलेले फोटो ब्लर होत नाहीत.

प्रश्न ३: UFS 2.2 आणि UFS 3.1 स्टोरेजमध्ये काय फरक आहे? 

उत्तर: UFS 3.1 किंवा 4.0 हे UFS 2.2 पेक्षा दुप्पट ते तिप्पट वेगाने डेटा वाचतात आणि लिहितात. यामुळे मोठे ॲप्स सेकंदात उघडतात, फाईल ट्रान्सफर वेगाने होते आणि फोन दीर्घकाळ स्मूथ चालतो.

प्रश्न ४: 'फ्लॅगशिप किलर' स्मार्टफोन म्हणजे काय? 

उत्तर: जे फोन्स प्रीमियम फ्लॅगशिप (उदा. ६०-७० हजारांचे फोन्स) सारखेच हाय-एंड प्रोसेसर आणि फीचर्स देतात, पण त्यांची किंमत तुलनेने कमी (साधारण ३५ ते ४५ हजार) असते, त्यांना फ्लॅगशिप किलर म्हणतात. पैशाच्या योग्य मोबदल्यासाठी हे फोन्स सर्वोत्तम मानले जातात.

प्रश्न ५: Online vs Offline कुठून घ्यावा नवीन फोन? 

उत्तर: दोन्हीचे स्वतःचे वेगळे फायदे आहेत. जर तुम्हाला भारी डिस्काउंट्स, बँक कार्ड ऑफर्स, एक्सचेंज बोनस आणि सर्व मॉडेल्सची व्हरायटी हवी असेल, तर ऑनलाईन (Amazon किंवा Flipkart सेलमध्ये) खरेदी करणे फायदेशीर ठरते. 

पण जर तुम्हाला फोन प्रत्यक्ष हातात घेऊन त्याचा कॅमेरा, वजन आणि डिस्प्ले तपासायचा असेल, तर ऑफलाईन दुकानातून घेणे योग्य. सर्वोत्तम मार्ग म्हणजे - ऑफलाईन दुकानात जाऊन फोन हाताळून बघा. (Croma, Reliance Digital or Vijay Sales) 

जिथे (ऑनलाईन किंवा ऑफलाईन) चांगली ऑफर किंवा कमी किंमत मिळेल, तिथून खरेदी करा!

प्रश्न ६: तुम्ही तुमचा Phone कधी Upgrade करावा? 

उत्तर: दरवर्षी नवीन फोन घेण्याची अजिबात गरज नाही. खालील परिस्थितीमध्येच फोन अपग्रेड करण्याचा विचार नक्की करावा:

  • जेव्हा तुमचा जुना फोन खूप हँग होऊ लागतो आणि "PUBG , BGMI" सारखे ॲक्शन गेम्स खेळताना फ्रेम ड्रॉप्स किंवा लॅग जाणवतो.
  • बॅटरी हेल्थ खूपच कमी झाली असेल आणि फोन दिवसातून २-३ वेळा चार्ज करावा लागत असेल.
  • तुमच्या फोनला नवीन सिक्युरिटी आणि अँड्रॉइड (OS) अपडेट्स मिळणे बंद झाले असेल (साधारण ३-४ वर्षांनंतर).
  • जर तुम्हाला सध्याच्या फोनपेक्षा कॅमेरा क्वालिटी, उत्तम गेमिंग परफॉर्मन्स आणि बॅटरी लाईफमध्ये मोठा बदल हवा असेल आणि त्यासाठी साधारण ₹०,०००, ₹३०,००० किंवा ₹४०,००० चे बजेट असेल, तर नवीन 'फ्लॅगशिप किलर' कडे अपग्रेड करणे हा एक उत्तम निर्णय ठरतो.

प्रश्न ७: Best Android UI? कोणता UI आहे सगळ्यात बेस्ट? 

उत्तर: 'बेस्ट UI' (User Interface) हा प्रत्येकाच्या वापराच्या सवयीवर अवलंबून असतो, पण ज्या UI मध्ये जाहिराती (Ads) आणि फालतू ॲप्स (Bloatware) नसतात तो सर्वोत्तम मानला जातो. सध्याचे टॉप UIs खालीलप्रमाणे आहेत:

  • Stock Android (Motorola, Google Pixel): हा सर्वात 'क्लीन' आणि सुरक्षित UI आहे. यात फक्त गुगलचे आवश्यक ॲप्स असतात आणि हा जुन्या फोन्सवरही अतिशय फास्ट चालतो.
  • OxygenOS (OnePlus) आणि Nothing OS: हे अत्यंत स्मूथ आणि फास्ट ॲनिमेशनसाठी ओळखले जातात.
  • OneUI (Samsung): जर तुम्हाला कस्टमायझेशन आणि भरपूर स्मार्ट फीचर्स (उदा. Knox Security, AI फीचर्स) आवडत असतील, तर सॅमसंगचा हा UI बेस्ट आहे. (टीप: स्वस्त बजेट फोन्समध्ये अनेकदा जाहिराती दाखवणारे आणि नको असलेले ॲप्स इन्स्टॉल करणारे UIs असतात, ते घेताना काळजी घ्यावी.)

प्रश्न ८: Curved Display आणि Flat Display मध्ये काय फरक आहे आणि कोणता डिस्प्ले बेस्ट आहे?

उत्तर: हा पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक पसंतीचा आणि फोन वापरण्याच्या पद्धतीचा प्रश्न आहे. या दोन्ही डिस्प्लेचे स्वतःचे असे फायदे आणि तोटे आहेत:

  • Curved Display (कर्व्ह्ड डिस्प्ले): हा डिस्प्ले फोनच्या कडांवरून थोडा वाकलेला असतो. यामुळे फोन दिसायला अत्यंत 'प्रीमियम' (Premium) आणि स्टायलिश वाटतो. फोन हातात धरल्यावर तो खूप स्लिम लागतो आणि व्हिडिओ पाहताना 'बॉर्डरलेस' (Edge-to-Edge) अनुभव मिळतो. 
    • तोटे: याचे स्क्रीन प्रोटेक्टर (Tempered Glass) बाजारात सहज मिळत नाहीत आणि ते खूप महाग असतात. फोन चुकून पडल्यास स्क्रीन फुटण्याची शक्यता जास्त असते. तसेच, फोन हातात धरताना कडांवरून अनेकदा 'Accidental Touches' (चुकीचे टच) होतात.
  • Flat Display (फ्लॅट डिस्प्ले): हा सर्वात प्रॅक्टिकल आणि सुरक्षित पर्याय आहे. यावर कोणताही टेम्पर ग्लास अगदी सहज आणि स्वस्तात बसवता येतो. फोन खाली पडला तरी कडांवरून स्क्रीन लवकर फुटत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 'Marvel Contest of Champions' सारखे टॅप आणि स्वाईप वाले इंटेंस ॲक्शन गेम्स खेळताना फ्लॅट डिस्प्ले सर्वोत्तम ठरतो. यात कडांवरून कोणतेही चुकीचे टच होत नाहीत, ज्यामुळे ऐन वेळी मॅच खराब होण्याची चिंता नसते.

तुमच्यासाठी कोणता बेस्ट आहे? जर तुम्हाला फोनचा लुक, डिझाईन आणि प्रीमियम फील सर्वात जास्त महत्त्वाचा वाटत असेल आणि तुम्ही फोन काळजीपूर्वक वापरत असाल, तर 'कर्व्ह्ड डिस्प्ले' नक्की घ्या. पण जर तुम्ही हेवी गेमर असाल, तुम्हाला प्रॅक्टिकॅलिटी हवी असेल आणि वारंवार फोन पडण्याची भीती असेल, तर 'फ्लॅट डिस्प्ले' डोळे झाकून निवडा!

प्रश्न ९: Super AMOLED, IPS LCD, OLED आणि pOLED डिस्प्लेमध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणता बेस्ट आहे?

उत्तर: स्मार्टफोनचा डिस्प्ले हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. या सर्व प्रकारांमध्ये खालीलप्रमाणे तांत्रिक फरक आहे:

  • IPS LCD: हे सर्वात जुने आणि बेसिक तंत्रज्ञान आहे. यात स्क्रीनच्या मागे एक सलग 'बॅकलाइट' (Backlight) असतो. प्रकाश नेहमी चालू असल्याने स्क्रीनवर 'परफेक्ट काळा' रंग दिसत नाही (तो थोडा राखाडी किंवा ग्रे दिसतो). हे डिस्प्ले आजकाल फक्त १० ते १२ हजारांच्या स्वस्त बजेट फोन्समध्ये मिळतात.
  • OLED (Organic Light Emitting Diode): यात बॅकलाइट नसतो. स्क्रीनवरील प्रत्येक पिक्सेल स्वतःचा प्रकाश तयार करतो. जेव्हा काळा रंग दाखवायचा असतो, तेव्हा तो पिक्सेल पूर्णपणे बंद होतो, ज्यामुळे 'परफेक्ट ब्लॅक' (Perfect Black) मिळतो आणि फोनच्या बॅटरीची मोठी बचत होते.
  • Super AMOLED: हे 'सॅमसंग'चे (Samsung) खास तंत्रज्ञान आहे. यात 'टच सेन्सर' स्क्रीनवर वेगळा लावण्याऐवजी डिस्प्लेमध्येच इनबिल्ट (Inbuilt) केलेला असतो. यामुळे स्क्रीन अधिक पातळ होते, कडक उन्हात (Direct Sunlight) अधिक स्पष्ट दिसते आणि रंग खूप जिवंत (Vibrant) वाटतात.
  • pOLED (Plastic OLED): मोटोरोला (Motorola) सारखे ब्रँड्स याचा जास्त वापर करतात. यात काचेऐवजी (Glass) प्लास्टिकच्या लेयरचा बेस असतो, ज्यामुळे स्क्रीन लवचिक बनते (कर्व्ह्ड किंवा फोल्डेबल फोन्ससाठी उत्तम) आणि चुकून फोन पडल्यास स्क्रीन लवकर फुटत नाही.

निष्कर्ष - कोणता बेस्ट आहे? जर तुमचे बजेट २०,००० रुपयांच्या वर असेल, तर LCD स्क्रीनकडे अजिबात बघू नका; नेहमी AMOLED किंवा Super AMOLED डिस्प्ले असलेलाच फोन घ्यावा. जर तुम्हाला मोबाईलवर वेब सिरीज पाहण्याची आवड असेल किंवा ग्राफिक्स-हेवी ॲक्शन गेम्स खेळायला आवडत असेल, तर AMOLED चे गडद रंग आणि उत्तम रिफ्रेश रेट तुम्हाला सर्वोत्तम व्हिज्युअल अनुभव देईल आणि फोनची बॅटरीही अधिक काळ टिकवेल!


 {fullWidth}

रघुनाथ डफळे

नमस्कार! 'Marathi Public' या ब्लॉगवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. माझे नाव रघुनाथ गणपती डफळे. मी महाराष्ट्राचा रहिवासी असून, माझी मातृभाषा मराठी आहे आणि माझे संपूर्ण शिक्षणही मराठी माध्यमातूनच झाले आहे. मी MCA पदवीधर असून, मला IT आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये (विशेषतः बँकिंग आणि फायनान्स) ८+ वर्षांचा सखोल अनुभव आहे. तसेच, SEO आणि ब्लॉगिंगचे मला विशेष ज्ञान आहे. माझ्या डिजिटल क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा, या हेतूने मी हा ब्लॉग सुरू केला. तंत्रज्ञान, अर्थकारण (Finance) आणि दैनंदिन जीवनातील महत्त्वपूर्ण माहिती अगदी सोप्या, स्पष्ट आणि आपल्या मराठी भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे, हे माझे मुख्य ध्येय आहे. येथे तुम्हाला नेहमीच अचूक आणि प्रामाणिक माहिती मिळेल. तुमचा विश्वास आणि पाठिंबा हाच या ब्लॉगसाठी सर्वात मोठा प्रेरणास्रोत आहे. धन्यवाद. 🙏

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने